ठाणे – अंबिका नगरात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव २९ मे रोजी…


ठाणे – अंबिका नगरात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव २९ मे रोजी…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती….

ठाणे दि.२७ ( अजय मगरे ) भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त ठाणे – अंबिका नगर येथील श्री संत रोहिदास चौक येथे बुधवार दि.२९ मे रोजी सायंकाळी ७ वाजता जयंती महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Advertisement

यावेळी प्रमूख पाहुणे म्हणून एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. तसेच खासदार श्रीकांत शिंदे, आमदार रविंद्र फाटक, शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के, मा नगरसेवक एकनाथ भोईर, मा नगरसेविका एकताताई भोईर, महिला आघाडीच्या मिनाक्षीताई शिंदे , मा नगरसेवक प्रकाश शिंदे , युवा सेनेचे यज्ञेश
भोईर, ऋषिकेश माने,उप विभाग प्रमूख राजेंद्र देसाई आदी उपस्थित राहणार आहेत.

भीम संघर्ष मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मगरे, किशोर यादव, अजय गुप्ता, अनिल तिवारी यांनी या जयंती महोत्सवाचे आयोजन केले आहे.या महोत्सवात मराठी वाद्यवृंद ‘ धम्मपद ‘ भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!