वडाळा आगारातील बेस्ट कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्ती सोहळा संपन्न….
वडाळा आगारातील बेस्ट कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्ती सोहळा संपन्न….
मुंबई दि.४ ( अजय मगरे )
बेस्ट वडाळा आगारातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा शेवटचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाचे आयोजन वडाळा आगारातील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी केले होते.
यावेळी एससी/ एसटी/ व्हीजेएनटी/ओबीसी युनियनचे वडाळा आगारातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. युनियन तर्फे सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. महादेव धायगुडे बेस्ट सेवेतून बस निरिक्षक या पदावरून सेवानिवृत्त झाले, त्यांच्या सह बस निरिक्षक सुनिल मोरे, सुबराव निकम, प्रवतर्क शंकर फाटक,बस चालक हनुमंत जाधव, प्रकाश खोमणे, नामदेव माने,खंडू नायकोडी, विठ्ठल गायकवाड, मोहन निकाळजे आणि आनंदा पाटील इत्यादी कर्मचारी सेवानिवृत्त झाले.
त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम वडाळा आगारात आयोजित करण्यात आला होता.या सर्वांचे अधिकारी – कर्मचाऱ्यांसोबत अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या या सत्कार सोहळ्यास मोठया प्रमाणात अधिकारी – कर्मचारी वर्ग उपस्थित होता.अनेकांनी आपल्या मनोगतात त्यांच्या कार्य,कर्तव्य,काम करण्याची शैलीचा उपस्थितांना जाणीव करुन दिली.
या प्रसंगी असोसिएशनचे कार्यकर्ते सुभाष गायकवाड ,विनोद इंगळे, गोरख साबळे, विपुल चंदनशिवे संजय जाधव, संतोष खरात , सुनील वाघमारे, अनिल साळवे, विनय जयस्वाल ,शांताराम बहिर, शैलेश कांबळे ,सचिन पवार, अमोल कांबळे ,भरत कांबळे , श्यामसुंदर गर्जे आदी उपस्थित होते