रामदास आठवलेंचा तिसऱ्यांदा मंत्रिमंडळात समावेश, ठाण्यात जल्लोष.
रामदास आठवलेंचा तिसऱ्यांदा मंत्रिमंडळात समावेश, ठाण्यात जल्लोष..
ठाणे दि.९ ( अजय मगरे )
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचा एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल ठाणे शहरातील अंबिका नगरात रिपब्लिकन पक्षाच्या वतीने रविवारी ( दि.९ ) संध्याकाळी आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला.
डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात रिपब्लिकन पक्ष आणि आंबेडकरी समाज बांधवांच्या वतीने मंत्री रामदास आठवले यांचा राज्यमंत्री ( स्वतंत्र कार्यभार ) म्हणून सामावेश याबद्दल रिपब्लिकन पक्षाचे ठाणे शहर कार्याध्यक्ष प्रल्हाद मगरे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांना लाडू वाटप करण्यात आले.
यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या ठाणे शहर महिला उपाध्यक्षा विमलताई सातपुते, महिला वार्ड अध्यक्षा मायाताई तोत्रे, शाखा अध्यक्ष किरण झिने, राहुल मगरे, पांडुरंग सातपुते, नाथा मोरे, श्याम वाव्हळ, विशाल सोनवणे , समाधान वाघमारे, नितीन वाव्हळ, ताराबाई मोरे,चंद्रकला वाव्हळ, ज्योती ससाने, सीमा खरे ,सुमन जाधव आदि उपस्थित होते.