म्हाडाच्या मास्टरलिस्ट’चे विजेते घरांपासून वंचित…
म्हाडाच्या मास्टरलिस्ट’चे विजेते घरांपासून वंचित…
मुंबई दि.२५ ( मंगेश म्हात्रे )
म्हाडा संक्रमण शिबिरांतील रहिवाशांचा हक्काच्या घरांच्या मास्टरलिस्टचा घोळ अद्याप संपलेला नाही. २८ डिसेंबर २०२३ रोजी २६५ मास्टरलिस्ट वरील रहिवाशांच्या घरांची संगणकीय सोडत म्हाडा मुख्यालयात काढण्यात आली होती.
१५ दिवसांच्या आत स्वीकृती पत्रक सादर करून ४५ दिवसांच्या आत घराचा ताबा देण्याचा दावा म्हाडाच्या आर आर बोर्डाच्या वतीने करण्यात आला होता , मात्र सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही विजेत्या रहिवाशांना अदयाप घराचे देकार पत्र मिळाले नसल्याने रहिवाशी घरापासून वंचित असल्याचे दिसून येते.
मुंबईतील सेस इमारतींतील ‘मास्टर लिस्ट’मधील घरांच्या वितरणावरून यापूर्वी बरेच वादंग उभे राहिले आहेत. या घरांच्या वितरणात भ्रष्ट यंत्रणा कार्यरत असून दलालांसोबत साटेलोटे असल्याने पात्र रहिवाशांना घरे मिळणे अवघड झाले आहे, असा आरोप वारंवार केला जातो. याच अनुषंगाने मास्टरलिस्टमधील प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी पहिल्यांदा संगणकीय पद्धतीने मास्टरलिस्टची सोडत काढण्यात आली होती. संगणकीय सोडत रहिवाशांसाठी हिताची ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र सोडत होऊन सहा महिन्यांचा कालावधी उलटून ही विजेत्या रहिवाशांना हक्काच्या घराचा ताबा मिळालेला नाही त्यामुळे शेकडो विजेत्यांचा भ्रमनिरास झाला आहे.याविषय सह मुख्यधिकारी उमेश वाघ यांनी सांगितले लॉटरी काढलेल्या मास्टर लिस्ट मध्ये काही तक्रारारी प्राप्त झाल्याने त्यांची पुन्हा तपासणी करण्यात आली असून लवकरच घरे वाटप करण्यात येणार आहे.
मंगेश म्हात्रे
मोबाईल -9833624218