संविधानाद्वारे भारताचा आदर्श नागरिक बनावे – एस के भंडारे
संविधानाद्वारे भारताचा आदर्श नागरिक बनावे – एस के भंडारे
समता सैनिक दलाचा समता फोर्स कॅम्प सुरु..
सांगली दि.1 ( प्रतिनिधी )
भारतीय संविधानातील न्याय, स्वतंत्रता, समता, बंधुता या चार मूलभूत तत्त्वांवर आधारित नवीन आदर्श भारतीय नागरिक घडवण्याचे काम करावे, असे प्रतिपादन समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर आणि दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष एस के भंडारे यांनी केले.
त्यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे जनक आहेत आणि त्यांनी निर्माण केलेले संविधान देशाच्या समृद्धतेचा पाया आहे.
समता सैनिक दलाच्या
राज्यस्तरीय समता फोर्स कॅम्पचे आयोजन दि 1/9/2024 ते 7/9/2024 या कालावधीत पंचशील करिअर अकॅडमी, पलूस (जि. सांगली) येथे करण्यात आले.
उद्घाटन समारंभात एस के भंडारे आणि पंचशील करिअर अकॅडमीचे संस्थापक व संचालक हिम्मत होवाळ यांच्या हस्ते भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून कॅम्पची सुरुवात करण्यात आली. एस के भंडारे यांच्या हस्ते ध्वजारोहणही करण्यात आले.
या कॅम्पमध्ये अँड डॉ एस एस वानखडे (राष्ट्रीय सचिव /केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख व असि. स्टाफ ऑफिसर ), अशोक कदम ( असि. स्टाफ ऑफिसर ), दादासाहेब भोसले (असि. स्टाफ ऑफिसर ), डी एम आचार्य (हेडक्वार्टर सचिव व असि. लेफ्टनंट जनरल ), पी एस ढवळे (असि. लेफ्टनंट जनरल ), उमेश बागुल ( असि. लेफ्टनंट जनरल ), व्हि.डी. हिवराळे ( मेजर जनरल ), मोहन सावंत ( हेडक्वार्टर उप सचिव व लेफ्टनंट कर्नल ),रविंद्र इंगळे ( सचिव, महाराष्ट्र राज्य व लेफ्टनंट कर्नल ), रुपेश तामगांवकर (मेजर व जिल्हा अध्यक्ष सांगली पूर्व ) हे अधिकारी प्रशिक्षण देणार आहेत.
या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रातील मुंबई,रायगड,पुणे,सांगली,कोल्हापूर,अहमदनगर, लातूर,परभणी, उस्मानाबाद, नांदेड, औरंगाबाद, अकोला, बुलढाणा, वाशीम, जालना या जिल्ह्यातून समता सैनिक दलाचे 51अधिकारी व सैनिक सहभागी झाले आहेत.या शिबिरासाठी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया सांगली पश्चिम जिल्हा शाखा अध्यक्ष रविंद्र लोंढे यांनी कॅम्प मधील शिबिरार्थीना वह्या, पेन वाटप केले.
या समता सैनिक दलाच्या समता फोर्स कॅम्पचा समारोप 7 सप्टेंबर रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ भीमराव य आंबेडकर (ट्रस्टी /राष्ट्रीय कार्याध्यक्ष,दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व राष्ट्रीय अध्यक्ष, समता सैनिक दल ) यांच्या हस्ते होणार आहे.