‘बहुजन शक्ती’चा दिलीपराव गायकवाड यांना पाठिंबा…
‘बहुजन शक्ती’चा दिलीपराव गायकवाड यांना पाठिंबा…
शिर्डी – कोपरगाव मतदारसंघातून ‘बहुजन शक्ती’ कडून दिलीपराव गायकवाड यांना उमेदवार म्हणून जाहीर पाठिंबा
ठाणे, दि. २३ (अजय मगरे)
शिर्डी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापलेले असताना, बहुजन शक्ती या सामाजिक संघटनेने शिर्डी आणि कोपरगाव या दोन्ही मतदारसंघातून दिलीपराव गायकवाड यांना अपक्ष उमेदवार म्हणून जाहीर पाठिंबा दिला आहे.
दिलिपराव गायकवाड हे बहुजन शक्ती संघटनेचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष आहेत, तसेच ते बहुजन शक्ती ऑनलाईन न्यूजचे कार्यकारी संपादक देखील आहेत. शिर्डी आणि कोपरगाव तालुक्यातील जनतेमध्ये त्यांचा चांगला जनसंपर्क असून, त्यांना या मतदारसंघात चांगला पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गायकवाड यांनी बहुजन समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडत आंबेडकरी चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीमुळे शिर्डी-कोपरगाव मतदारसंघातील राजकीय समीकरणे अधिकच रंजक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे