ठाण्यात मराठवाडा मुक्तीसंग्राम सोहळ्याचे आयोजन..
मराठवाडा जनविकास परिषदेतर्फे ..
ठाण्यात मराठवाडा मुक्तिसंग्राम सोहळ्याचे आयोजन ..
ठाणे दि.२८ ( अजय मगरे ) ठाण्यातील मराठवाडा जनविकास परिषदेच्या वतीने ठाणे शहरातील गडकरी रंगायतन येथे मराठवाडा मुक्तिसंग्राम सोहळा आणि मराठवाडा भूषण व मराठवाडा रत्न पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन रविवार दिनांक २९ सप्टेंबर रोजी सायं.४.३० वाजता करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विश्वधर्मी डॉ विश्वनाथ कराड आणि डॉ गोपाळराव पाटील यांना मराठवाडा भूषण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तसेच डॉ गणेश चंदनशिवे,बाळासाहेब गित्ते,अक्षय रासकर यांना मराठवाडा रत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रताप सरनाईक,आमदार संजय केळकर व ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे उपस्थित राहणार आहेत.
मुंबई,ठाणे आदी शहरी भागात राहणाऱ्या मराठवाड्यातील जनतेला एकित्रित करून त्यांच्यासाठी सामाजिक कामे करणाऱ्या मराठवाडा जनविकास परिषदेचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे,महासचिव संजय पोलसाने ,कोषाध्यक्ष लक्ष्मण पुरी,नितीन कदम,डॉ अशोक नांदापूरकर,डॉ अविनाश भागवत,संतोष काशीद,डॉ संतोष कदम,दिलीप सपाटे,राजीव कुलकर्णी,डॉ राहुल कुलकर्णी,अतुल नाईक,मुकुंद हातोटे,पांडुरंग घुले,डॉ कारभारी खरात,कुणाल बोगाणे,अजय देशमुख आदींनी या सोहळ्यास सर्वानी उपस्थित राहावे असे,आवाहन केले आहे तसेच डॉ चंदनशिवे यांचा ‘महाराष्ट्राचा लोकमेळा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.