कोचिंग क्लासेस संचालक संघटने तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
कोचिंग क्लासेस संचालक संघटने तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
ठाणे, दि.२८ (अजय मगरे)
कोचिंग क्लासेस संचालक संघटना, महाराष्ट्र राज्याच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध लेखक, कवी, व्याख्याते व प्राध्यापक प्रवीण दवणे उपस्थित होते. याचसोबत संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष सतीश देशमुख, उपाध्यक्ष प्रकाश पाटील, सचिव अॅड. सचिन सरोदे आणि खजिनदार सुनील सोनार आदी हजर होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश वामन व अनिल काकुळते यांनी केले. या कार्यक्रमात ९ आदर्श शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रत्येक क्लास संचालकास स्मार्ट कार्ड, प्रमाणपत्र आणि गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार विजेत्यांमध्ये सर्वात विशेष उल्लेखनीय ठरले ते प्रा. सोमनाथ जाधव (ज्ञानज्योत अकॅडमी, बजाजनगर, आसेगाव) आणि प्रा. समाधान शिंदे (शिंदे सरांचे कोचिंग क्लासेस, रांजणगाव). दोघेही लांबच्या गावांमधून आले असून, त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशासाठी केलेल्या अथक परिश्रमामुळे या पुरस्काराला योग्यतेने पात्र ठरले आहेत. प्रा. अतुल मोरे (ओमकार कोचिंग क्लासेस, रांजणगाव) यांनीही विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ठ यशामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते:
प्रा. स्वप्नील राणे (एस. आर. एस. ग्रुप ट्युशन, भांडुप) – विद्यार्थ्यांच्या यशामध्ये सातत्य ठेवून, त्यांच्या अध्यापन शैलीमुळे उल्लेखनीय योगदान.
प्रा. सोमनाथ जाधव (ज्ञानज्योत अकॅडमी, बजाजनगर, आसेगाव, करोडी) – अतिशय लांबच्या गावातून आलेल्या जाधव सरांनी विद्यार्थ्यांच्या यशासाठी विशेष मेहनत घेतली आहे.
प्रा. समाधान शिंदे (शिंदे सरांचे कोचिंग क्लासेस, रांजणगाव) – शिंदे सरांचा शैक्षणिक पद्धतीत नेहमी नावीन्यपूर्ण दृष्टिकोन राहिला आहे.
प्रा. अतुल मोरे (ओमकार कोचिंग क्लासेस, रांजणगाव) – विद्यार्थ्यांच्या शिक्षणात सातत्यपूर्ण योगदान.
प्रा. धवल चंपानेरकर (यशस्वी कोचिंग क्लासेस, कळवा).
प्रा. निर्मला हनुमान थोरात (अभिनव युट्युरीयल्स, काल्हेर).
प्रा. सिध्दी विनायक पाटिल (सक्सेस ग्रुप, द चाणक्य एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, दापोडे, भिवंडी).
प्रा. शैलेश शेट्टींगर (स्वास्तिक ट्युशन, मानपाडा).
प्रा. हरिमोहन त्रिपाठी (अपेक्स कॉमर्स ट्युटोरिअल, मनोरमा नगर).
यावेळी प्रा. अक्षय व्यवहारे यांनी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक निकाल कसा वाढवायचा याविषयी मार्गदर्शन केले, तर प्रमुख पाहुणे प्रा. प्रवीण दवणे यांनी देखील शिक्षकांच्या भूमिकेबद्दल प्रेरणादायी विचार मांडले.