‘समाज कल्याण’ च्या विरोधात रिपब्लिकन विद्यार्थी परिषदेची बाईक रॅली …
‘समाज कल्याण’ च्या विरोधात रिपब्लिकन विद्यार्थी परिषदेची बाईक रॅली …
मुंबई, दि.२८ ( प्रतिनिधी ) भारतीय संविधानाचे निर्माते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारच्या समाज कल्याण खात्याकडून मंजूर करण्यात आलेला कोट्यावधी रुपयांचा निधी समाज कल्याण विभागाने अडकून ठेवल्याचा आरोप करीत गेल्या एक महिन्यापासून रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेने राज्यभर आंदोलने केली होती. या आंदोलनाची सांगता माता रमाबाई आंबेडकर नगर ते दादर चैत्यभूमी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन बाईक रॅली काढून करण्यात येणार असल्याची माहिती बहुजन रिपब्लिकन विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे यांनी दिली आहे.
पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मुंबई नवी मुंबई औरंगाबाद, सोलापूर आधी ठिकाणच्या संस्थांच्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी करोड रुपये मंजूर करण्यात आले होते. परंतु हा निधी देण्यास राज्य सरकार टाळाटाळ करीत असल्याचा आरोप बहुजन रिपब्लिकन विद्यार्थी परिषदेचे चंद्रशेखर कांबळे यांनी केला आहे. या निषेधार्थ राज्यभर केलेल्या आंदोलनाची सांगता दादर येथील चैत्यभूमीवर होणार आहे. त्यानंतर राज्य सरकारला निवेदन सादर करून तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात येणार असल्याची माहिती ही बहुजन विद्यार्थी परिषदेचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सचिन बनसोडे यांनी दिली आहे.