भारतीय बौद्ध महासभेची आनंद नगर, कोपरी येथे शाखा..
भारतीय बौद्ध महासभेची आनंद नगर, कोपरी येथे शाखा..
ठाणे, दि. ३० ( अजय मगरे )
बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार वाढवण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेच्या ठाणे शहरातील आनंद नगर, कोपरी येथे शाखा स्थापन करण्यात आली.
रविवार, दि. २९ सप्टेंबर २०२४ रोजी शाखेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली, ज्यात खालील सदस्यांची निवड करण्यात आली आहे:
अध्यक्ष : राहुलजी कांबळे
सरचिटणीस : बौध्दाचार्य संदिपजी बनकर
कोषाध्यक्ष : कविताताई साळवे
हिशोब तपासनीस : सुभाषजी भोसले
संस्कार उपाध्यक्ष : प्रेम हिवराळे
संरक्षण उपाध्यक्ष : विकासजी इंगळे
प्रचार पर्यटन उपाध्यक्ष : हेमंतजी कांबळे
महिला उपाध्यक्ष : शुभांगीताई कांबळे
संस्कार सचिव : राकेशजी पवार
संरक्षण सचिव : रवि बच्छाव
महिला सचिव : पुजाताई बनकर
प्रचार पर्यटन सचिव : हरेशजी दाभोळे
संघटक : प्रविणभाऊ गायकवाड
संघटक : शामभाऊ जाधव
या कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे ठाणे तालुका अध्यक्ष निकम गुरुजी यांनी उपस्थित बौद्ध बांधवांना महासभेचे ध्येय धोरणे समजावून सांगितली. तसेच धम्म चळवळीला गती देण्यासाठी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला आनंद नगर बुद्ध विहारात नागरिकांची उपस्थिती उत्साहपूर्ण होती.