डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय व समता पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांचा सत्कार


डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय व समता पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांचा सत्कार

कोपरगाव दि.३ ( दिलीप गायकवाड )

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय व समता पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने समता स्टडी पॉइंट मधील स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थी राहुल गोरक्षनाथ लव्हाटे व शाहरुख फारूक शेख यांचा सत्कार करण्यात आला.

Advertisement

राहुल लव्हाटे यांची राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कॉन्स्टेबलपदी निवड झाली असून, तो धामोरी गावचा रहिवाशी आहे. राहुलची आई शेतमजुरी करून त्याला शिकवले. आज त्यांच्या कष्टाचे फळ त्याला मिळाले आहे.

शाहरुख फारूक शेख, सुभाषनगर, कोपरगाव येथील रहिवाशी असून त्याची पालघर पोलिसपदी निवड झाली आहे. त्याच्या आईने शहरात धुनेभांडे करून त्याला शिकवले. त्यांच्या या यशामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात लेखक व कवी राजेंद्र कोयटे, जेष्ठ पत्रकार दिलीप गायकवाड, ग्रंथपाल राजेंद्र शेलार, महेश थोरात, गणेश राक्षे, सारिका राक्षे, आणि रेखा भांगरे आदी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!