पीएम किसान योजनेच्या लाभापासून वंचित शेतकऱ्यांची प्रकरणे तात्काळ मार्गी लावा..
पीएम किसान योजनेच्या लाभापासून वंचित शेतकऱ्यांची प्रकरणे तात्काळ मार्गी लावा..
छावा क्रांतीवीर सेनेचे तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन
ठाणे, दि. ९ (अजय मगरे)
पीएम किसान योजनेचा हप्ता काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. मात्र, पैठण तालुक्यातील असंख्य शेतकरी अद्यापही या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत, जरी त्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली असली तरी. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
वंचित शेतकरी कार्यालयात वारंवार जाऊन कागदपत्रे सादर करत आहेत, परंतु संबंधित कार्यालयाकडून त्यांना उडवाउडवीची आणि समाधानकारक नसलेली उत्तरे मिळत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा अपमान होत असून, संताप वाढत चालला आहे. छावा क्रांतीवीर सेनेने तालुका कृषी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात, वंचित शेतकऱ्यांना तात्काळ पीएम किसान योजनेचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. अन्यथा, आठ दिवसांत तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
निवेदनाच्या वेळी छावा क्रांतीवीर सेनेचे प्रदेश सरचिटणीस अनिल राऊत अ.भा.साईनाथ कर्डिले, चंद्रकात बारे, राकेश वाघे, कृष्णा काळे,श्यामराज येवले तसेच शेतकरी सोमनाथ मापारी, सुनील कतारे, सदाशिव आहेर, कारभारी काळे, भाऊसाहेब बाबर, शिवाजी जाधव, बापूराव आगळे, बबन खोपडे, विक्रम बोडखे, बाबुराव मगर, चंद्रकांत बोडखे, जगन्नाथ गिरी, सर्जेराव मिसाळ, बन्सी तांगडे, जमाल पठाण, मुसा शेख, विश्वनाथ कोळकर, दादासाहेब घोरतळे, रामेश्वर खरात, आजिनाथ खरात, भरत एरंडे, बाळकृष्ण गिरी, तातेराव चव्हाण, केशव तांगडे, अजिज शेख, सुखदेव एरंडे, बाळू खडसन, शांतीलाल राठोड, हिरामण जाधव, आदित्य कबाडी, अनिल गायकवाड, मानसिंग पवार, जावेद शेख आधी शेतकरी बांधव उपस्थित होते.