कोपरगावमध्ये डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळा रद्द का केला…
कोपरगावमध्ये डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळा रद्द का केला…
नगरपरिषदेने खुलासा करावा !
अन्यथा न्यायालयात जाणार – मातंग समाज क्रांती मोर्चाचा इशारा …
कोपरगाव दि.१४ ( दिलीप गायकवाड )
सोमवार, ७ ऑक्टोबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेला साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळा अचानक रद्द करण्यात आला आहे. नगरपरिषद व स्थानिक प्रशासनाच्या वतीने हा सोहळा मंत्री महोदय आणि इतर शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडणार होता.
नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी कार्यक्रम रद्द करण्याचे कारण दिले असले तरी, नागरिकांमध्ये याबाबत असमाधान व्यक्त केले जात आहे. कार्यक्रमाची पूर्ण तयारी असताना अचानक निर्णय घेतल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याचा विचार केला असून, नगरपरिषदेकडून १५ दिवसांत खुलासा देण्याची मागणी मातंग समाज क्रांती मोर्चाचे अनिल जाधव आणि संदीप निरभवणे यांनी मुख्याधिकारी यांना केली आहे.