कोपरगांव विधानसभेसाठी १३ अपक्ष उमेदवार रिंगणात


कोपरगांव विधानसभेसाठी १३ अपक्ष उमेदवार रिंगणात

कोपरगांव, दि. ३१ ( विजय हलवाई )

अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगांव मतदारसंघात अपक्ष उमेदवारांनी पक्षीय उमेदवारांना चांगलीच टक्कर देत असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे, कारण या निवडणुकीत १३ अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे निवडणुकीतील गणिते बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

कोपरगांव मतदारसंघात राजकीय पक्षांच्या उमेदवारांसोबतच अपक्ष उमेदवारांनीही निवडणुकीसाठी तयारी केली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाचे) संदीप वर्पे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचे ) आशुतोष काळे यांच्यात प्रमुख लढत होण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर, वंचित बहुजन आघाडीचे शकील चोपदार, बहुजन समाज पार्टीचे मेहबूबखा पठाण, राष्ट्रीय समाज पक्षाचे शंकर लासुरे, आणि बळीराजा पार्टीचे शिवाजी कवडे यांच्यातही चुरस पाहायला मिळेल.

Advertisement

मात्र, अपक्ष उमेदवारांच्या सहभागामुळे मुख्य पक्षीय उमेदवारांची मतांची वाटणी बिघडण्याची चर्चा कोपरगांवमध्ये रंगली आहे. यात ‘ बहुजन शक्ती ‘ पुरस्कृत तसेच बहुजन शक्ती न्यूज २४ चे कार्यकारी संपादक, जेऊर कुंभारी गावचे दिलीप गायकवाड अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत.

२१९- कोपरगाव विधानसभा मतदासंघ निवडणूक २०२४, उमेदवारांची यादी…

( १ ) आशुतोष काळे – राष्ट्रवादी
काँग्रेस ( अ. पवार ).
( २ ) संदिप वर्पे – राष्ट्रवादी काँग्रेस ( श.पवार ).
( ३ ) मेहबूबखा पठाण – ( बहुजन समाज पार्टी )
( ४ ) शकील चोपदार – ( वंचित बहुजन आघाडी )
( ५ ) शंकर लासुरे – ( राष्ट्रीय समाज पक्ष )
( ६ ) शिवाजी कवडे – ( बळीराजा पार्टी )
——-**——**—–
( ७ ) दिलीप गायकवाड – ( अपक्ष )
( ८ ) प्रभाकर अहिरे – ( अपक्ष)
( ९ ) किरण चांदगुडे – (अपक्ष)
( १० ) खंडू थोरात – ( अपक्ष)
( ११ ) चंद्रहंस औताडे – ( अपक्ष)
( १२) बाळासाहेब जाधव- ( अपक्ष )
( १३ ) मनिषा कोल्हे- ( अपक्ष )
( १४ ) राजेंद्र कोल्हे – (अपक्ष )
( १५ ) विजय जाधव-( अपक्ष)
( १६ ) विजय भगत – (अपक्ष)
( १७ ) विजय वंडागळे – ( अपक्ष )
( १८ ) विश्वनाथ वाघ -(अपक्ष)
( १९ ) संजय काळे- ( अपक्ष)


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!