कोपरी – पांचपाखाडीत रंगतदार तिरंगी लढत ! ९ उमेदवार रिंगणात
कोपरी – पांचपाखाडीत रंगतदार तिरंगी लढत ! ९ उमेदवार रिंगणात
ठाणे, दि.५ (अजय मगरे )
ठाणे लोकसभा मतदार संघातील १४७ कोपरी – पांचपाखाडी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. या निवडणुकीत तिरंगी लढतीची शक्यता आहे, ज्यामुळे स्थानिक मतदारांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मतदारसंघातून सलग चार वेळा निवडणूक जिंकली आहे, त्यामुळे त्यांची पकड या क्षेत्रावर अजूनही कायम असल्याचे मानले जात आहे. मात्र, या निवडणुकीत शिवसेना, अपक्ष आणि अन्य पक्षांचे ९ उमेदवार रिंगणात उतरले आहेत, ज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
(शिवसेना), केदार दिघे (शिवसेना – उबाठा), मनोज शिंदे (अपक्ष), बाबुकुमार कांबळे (लोकराज्य पार्टी), सुशिला कांबळे (रिपब्लिकन बहुजन सेना), अहमद अफजल शेख (अपक्ष), जुमन अहमद खानपठाण( अपक्ष ), मुकेश तिवारी (अपक्ष), आणि सुरेश पाटीलखेडे (अपक्ष) यांचा समावेश आहे.
कोपरी-पांचपाखाडी मतदारसंघात ठाणे स्टेशनच्या पूर्वेकडील भाग कोपरी गाव, आनंद नगर, लुईस वाडी, हाजुरी, रामचंद्र नगर, रामनगर, ज्ञानेश्वर नगर, अंबिका नगर, किसन नगर एक ते चार आणि वागळे इस्टेट हे परिसर येतात. या भागातील स्थानिक मतदारांसाठी अनेक पूनर्विकासाची कामे प्रलंबित आहेत, ज्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मतदारांचा कल कसा राहील याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
या मुख्यमंत्र्याच्या बालेकिल्ल्यात तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याबाबत सध्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.